Sunday, January 17, 2010

दोन वेडी पाखर.......

दोन वेडी पाखरंरोज खिडकीत भेटायची॥
चिमणी चिमणी प्रीत त्यांचीआभाळाला खेटायची..
चिमण्या चिमणीचे चिमणेसे रुसणे,चिमुकली समजूत॥
चिमणेसे हसणे॥
चिमण्या प्रीतीची चिमणी कविताखिडकीत माझ्या फुलायची…
चिमण्या प्रीतीचे रंग निराळे,चिमण्या चोचींतले चिमुकले चाळे॥
चिमण्या दोघांची चिमणी कहाणी,जणू परीकथाच वाटायची..

अनंत...........

ब-याचदा मी लहान मूल होतो॥
आणि अवखळ रूईच्या म्हातारीमागं धावत विसरून जावं घरदार...
तसं स्वत:ला विसरून या स्वरांमागे धावत जातो...
या देहाचे उंबरे लंघून...
शब्दांची कुंपणं तोडून॥
भावभावनांची वेस ओलांडून मी स्वरांसोबत चालू लागतो...
काही वेळानं ते माझा हात हातात घेतात॥
चालता चालता अलगद उचलून कडेवर घेतात॥
अन एक अनोखा प्रवास सुरु होतो॥
आम्ही अवकाशाचा कप्पा कप्पा व्यापत जातो॥
सारे आभास कापत जातो॥
सा-या दिशा व्यापून आम्ही दिगंत होतो॥
या स्वरांसोबत चालता चालता मी ही अनंत होतो..

Monday, March 2, 2009

आमच्या पवार आज्जी

बस मधे जाम गर्दी होती ,माझा जिवलग मित्र योगेश पाटिल एका सीटवर बाहेरच्या बाजूला चेमतुन बसला होता, त्याच्या शेजारी 70 वर्षाची पवार आजी ऊभ्या होत्या, तिने योगेश च्या पाठीवर टकटक केले, तेव्वा योगेश ला झोपेचे नाटक सोडून तिच्याकडे पहावेच लागले, तिने त्याच्या हातात च्यार बदाम ठेवले आणि मनाली "खा बाळा खा" योगेश ने चवी- चवी ने बदाम खाल्ले, आणि पुन्हा त्याचा डोळा लागला, पुन्हा पाठीवर टकटक झाल्यावरच तो उघडला, पवार आजीने पुन्हा त्याच्या हातात चार बदाम ठेवल्या, "खा बाळा खा" तब्बेतिला चांगले आसतात बदाम, योगेश ने पुन्हा बदाम चावले, आस्स परत दोनदा झाल्यावर योगेश मनाला आहो आजी ..... आस बदाम का वाटत फिरता ??? तुम्ही का नाही खात ते ?? तोंडाचा आ..... करत ........... पवार आज्जी मनाली ...... दात पडले बाळा माझे सगले !!! चावनार कशी बदाम ?? आहो पण तुम्ही खाऊ शकत नसताना महागडे बदाम वीकत घेता कशाला ?? .... हातातला चोकलेट चा पुडा नाचवत आज्जी निरागस पने मनाली ....... बदामाच्या भोवतीचा चोकलेट तरी चघळाता येतो ना मला !!!! :)

Sunday, March 1, 2009

Very useful………………….must for us !!!

नमस्कार. आम्ही माहिती तंत्रज्ञानातील आणि इतर संगणकीय बैठ्या क्षेत्रातील 'बुद्धिजीवी' वीर. आमचं डोकं आणि संगणकाच्या कळफलकावरील बोटे या दोनच काय त्या ' चालणाऱ्या ' गोष्टी. हातही खूप चालतीलच असं नाही . 'ctrl A','कॉपी ',' कट',' पेस्ट' ही वरदाने आम्ही जेव्हा संधी मिळेल तेव्हा वापरतोच .

आम्ही 'बुद्धिजीवी ' म्हणे . डोकं चालवणे( किंवा कधीकधी तसं दाखवणे ) या श्रमाच्या मोबदल्यात आम्हाला सर्व काही बसल्या जागी हवं असतं. चहा कॉफी यंत्र, फोन, वातानुकूलन, शक्यतो सर्व संगणकावर ,जे नाईलाजाने कागदोपत्री ठेवावे लागते त्यासाठी बसल्या जागी हात लांबवून घेता येतील किंवा चार पावलांवर असतील अशी फायलींची कपाटे. पलीकडे बसलेल्या मित्राकडे पण आम्ही चालत जात नाही. आमची 'एक्झिक्यूटीव्ह ' खुर्ची बसूनच सरकवत जातो . नोकरी बघतानाच कार्यालयाला जायला लिफ्ट आहे ना हे पाहून घेतो. पार्किंगपर्यंत आणि पार्किंगपासून कचेरीपर्यंत चालावं लागतं म्हणून आम्ही किती कुरकुरतो. संध्याकाळी घरी यायच्या ऐवजी रात्रीच घरी येतो . एकदा आलो घरी की कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडेपण जात नाही. कापलेली भाजीच घरी मागवतो. खूपच उशीर झाला तर पोळ्या पण विकतच आणतो. किंवा ना, शक्यतो बाहेरुन येतानाच कचेरीतून संध्याकाळचा नाश्ता खाऊन येतो , म्हणजे घरी आल्यावर खिचडी टाकली की झालं.

हातात आम्ही थोडा जास्त पैसा खेळवतो आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवणारी यंत्रे खरेदी करण्यात करतो. वॉशिंग मशिन पाहिजेच . मिक्सर , ज्यूसर , रिमोट वाला टीव्ही आणि रिमोट वालाच प्लेयर..' कमीत कमी श्रम आणि सोप्यात सोपं' हे आमचं ब्रीदवाक्य आहे.
तसे आम्ही श्रमही करतो, पण डोक्याचेच . तासनतास खुर्चीवर बसतो , पण वेडेवाकडे रेलून. पाठीच्या कण्याला ताठ राहण्याची सवयच नाही. तासनतास संगणकाच्या पडद्याकडे डोळे तारवटून बघत बसतो . मग थकवा घालवायला सिगारेट किंवा चहा कॉफी मारतो, नाहीतर बाहेर मिळेल ते चिप्स वगैरे चमचमीत खाद्य चरत बसतो. रविवारी कधीकधी साहेबांबरोबर ओल्या पार्ट्या करतो. कचेरीतही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मलई कोफ्ता किंवा पिझ्झा बर्गर वडापाव चापतो. जर पिझ्झा किंवा बर्गर खाल्लं तर पाण्याऐवजी कोक पेप्सी ढोसतो. कामाच्या भरात आम्ही जेवणाच्या वेळा चुकवतो आणि मग वडापाव किंवा डोसा यावर वेळ मारून नेतो. कामात चिडचिड झाली तरी वरवर हसतो . आणि ताणाने डोकं दुखत असलं तरी ' शो मस्ट गो ऑन ' म्हणून गोळी घेऊन परत कामाला लागतो..

वर्षानुवर्ष अशी जातात. आम्ही ' तरुण आहे तोपर्यंत लाईफ उपभोगा' म्हणून अनियमित दिनक्रम आणि सवयी नियमित चालूच ठेवतो . पण हल्ली चुकून माकून दोन जिने चढावे लागले तर दम का लागतो असं आम्हाला कोडं पडतं. वयोमानानुसार थकूनही आमचे आई वडील आमच्यापेक्षा जास्त उत्साही आणि काटक असतात . आम्ही मात्र क्वचित पर्वतीच्या पायऱ्या चढायलाही नकार देतो आणि ज्या मंदिराच्या नाकाशी पार्किंग असेल तिथे जाऊन दर्शन घेऊन येतो..पाठ का दुखते आणि पोट का सुटतं म्हणून आम्ही तज्ज्ञ लोकांकडे जातो. सल्ले आणि औषधांसाठी पैसे ओततो. केस जरा जास्तच गळतात हल्ली, म्हणून महागडी औषधं आणि तेलं सुरू करतो. पण जीवनशैली मात्र बदलत नाही . ' पर्यायच नाही.' असं म्हणून आपण पर्याय शोधत बसत नाही.

अशीच आणखी काही वर्षं जातात .. तिशी पस्तिशीतच बीपी, हार्ट आणि डायबिटीस सर्वच हात धुऊन मागे लागतं . कमावलेले पैसे तपासण्या आणि दवाखान्यांकडे वाहू लागतात . डॉक्टरच खडसावून सांगतात आणि हजार पथ्यं देतात. योगा , प्राणायाम, चुंबकचिकीत्सा , रेकी.. जो जो जे जे काही सांगेल ते आम्ही अजमावून बघतो . 'सिगारेटी पीत नाही, जरा जास्त बिस्कीटं खाल्ली तर बिघडलं कुठे ?' असे युक्तिवाद स्वतःशीच करत बसतो. 'इतरांसारखे आपण आपल्या वयाचे दिसत नाही' म्हणून खंत वाटते .. आपलेच आधीचे फोटो पाहून आपण उसासे सोडतो. त्यातल्या त्यात उपाय म्हणून बाजारात कुठलंसं अँटी रिंकल क्रीम शोधतो ..पण आपलं काही चुकतं असं आपल्याला मुळी वाटतच नाही . कारण आपल्याकडे ' पर्यायच नसतो .'

खरंतर आम्ही ठरवलं तर तिशी पस्तीशी येण्याआधीच या सर्वांवर उपाय शोधू शकतो . अगदी सर्वच नाही तरी होणारं अर्धं नुकसान तरी टाळू शकतो . खरंतर आम्हीमधला कोणीही 'मी ' हे उपाय जास्त कष्ट न घेताही करू शकतो.

१. एक्झिक्यूटीव्ह खुर्चीची उंची व्यवस्थित करून ठेवणे व त्यावर ताठ बसणे.
२. वेळी अवेळी चहा कॉफीवर पर्याय शोधणे . सरबत किंवा काही नसल्यास घरुन लिंबू घेऊन जाऊन लिंबू पाणी.
३. दुपारच्या जेवणात जड भाज्या कमीत कमी व कोशिंबीरी जास्त.
४. रोज जास्तीत जास्त पाणी पिणे.
५. लिफ्टऐवजी जिने चढणे.
६. आठवड्यातून एकदोनदा बाथरुमची फरशी घासणे .
७. घरात जास्तीत जास्त वेळा आतबाहेर करणे .
८. ओल्या पार्ट्यांत कोक पेप्सी दारू ऐवजी फळांचे रस पिणे.
९. सकाळच्या नाश्त्यात तेलकट खाण्याऐवजी पोळी, कच्चे तेल दाण्याची चटणी किंवा सॅण्डविच खाणे .
१०. मित्रांबरोबर सिगारेट किंवा चहा कॉफी या मार्गाने वेळ घालवण्याऐवजी त्यांना फिरत फिरत गप्पा मारण्यास प्रवृत्त करणे.
११. जितक्यादा शक्य आहे तितक्यादा कचेरीत डोळे पाण्याने धुणे .
१२. राग, ताण मनात न ठेवता ताबडतोब चांगल्या मित्राला /मैत्रिणीला बोलून मन हलके करणे आणी त्यांनाही तसे करण्यास प्रवृत्त करणे .
१३. काम करताना चिप्स चरण्याऐवजी चणे किंवा राजगिऱ्याच्या चिक्कीवर चरणे.
१४. दुचाकी/ चौचाकी चालवत असताना सिग्नलवर पायांचे , खांद्याचे आणि मानेचे व्यायाम करणे. लोक जरा विचित्र नजरेने बघतात, पण त्यांनाही विचित्र गोष्टी बघण्याची सवय आहेच . काल नाही का , हिरवे आणि लाल केस रंगवलेली कॉलेज तरुणी बघत होते..
१५. रोज किमान एकदा तरी खरंखुरं खळखळून हसणे.
१६. कडू, तुरट या चवींना खाण्यातून बाजूला ठेवू नये .

Thursday, February 26, 2009

गोष्ट चम्बुची !!!

हाए चंबू कसा आहेस तू ????
कार मधून आवाज़ आला आणि बस ची वाट बघत उभा आसलेला चंदू गबाले चक्क्च राहिला ...
चक्क मदनिका मस्ताद ? कॉलेज ची एके वेळेची ब्यूटी क्वुइन ! आक्खा वर्ग घायाळ होऊन जायचा ती सुंदरी साक्षात् समोर उभी ?
चल मी तुला ड्रॉप करते ...
कॉलेजात ओलखिचा कटाक्ष ही ना टाकलेल्या मदनिकेन ओळख देने ! हे चंबू ला स्वप्न वाटल..
क्वाफी पिउया कुठे तरी ! इतक्या वर्षानी भेतलोय चल गप्पा मारुया ...............
चम्बुचा आचाम्बा वाढतच होता ..
होटेलात गेलो तर गर्दीच आसनार ? चल माज्या घरीच जाउया !!!
आता चिमटे काढून चन्दुच अंग कालानिला पडायची वेल चंदुवर आली होती .......
घरी गेल्यावर.... येना तुला बेडरूम दाखवते ! ये बस पलंगावर ! तुला उकडत नाही का ?? मला तर कपडे धरवत नाहीत, मदनिका मन्हाली !!! तिने त्याचे कपडेही काढले............
म्हणाली थांब मी आलेच !! आस मनत ती बाहेर पडली ! लुकडा चंबू बेशुद्द्धा पडायची वेल आली होती !!! त्याच वेळा मदनिका बेडरूम मधे आली ...तिच्या मुलासोबत .......... आणि दोन्ही मुलाना मनाली.. रोज होर्लेक्स नाही प्यालात तर तुम्ही आसेच या मामा सारखे लुकडे दिसाल....... :( !!! काय झाल आसेल चंबू च देव जानो............................

key of life!!