दोन वेडी पाखरंरोज खिडकीत भेटायची॥
चिमणी चिमणी प्रीत त्यांचीआभाळाला खेटायची..
चिमण्या चिमणीचे चिमणेसे रुसणे,चिमुकली समजूत॥
चिमणेसे हसणे॥
चिमण्या प्रीतीची चिमणी कविताखिडकीत माझ्या फुलायची…
चिमण्या प्रीतीचे रंग निराळे,चिमण्या चोचींतले चिमुकले चाळे॥
चिमण्या दोघांची चिमणी कहाणी,जणू परीकथाच वाटायची..
Sunday, January 17, 2010
अनंत...........
ब-याचदा मी लहान मूल होतो॥
आणि अवखळ रूईच्या म्हातारीमागं धावत विसरून जावं घरदार...
तसं स्वत:ला विसरून या स्वरांमागे धावत जातो...
या देहाचे उंबरे लंघून...
शब्दांची कुंपणं तोडून॥
भावभावनांची वेस ओलांडून मी स्वरांसोबत चालू लागतो...
काही वेळानं ते माझा हात हातात घेतात॥
चालता चालता अलगद उचलून कडेवर घेतात॥
अन एक अनोखा प्रवास सुरु होतो॥
आम्ही अवकाशाचा कप्पा कप्पा व्यापत जातो॥
सारे आभास कापत जातो॥
सा-या दिशा व्यापून आम्ही दिगंत होतो॥
या स्वरांसोबत चालता चालता मी ही अनंत होतो..
आणि अवखळ रूईच्या म्हातारीमागं धावत विसरून जावं घरदार...
तसं स्वत:ला विसरून या स्वरांमागे धावत जातो...
या देहाचे उंबरे लंघून...
शब्दांची कुंपणं तोडून॥
भावभावनांची वेस ओलांडून मी स्वरांसोबत चालू लागतो...
काही वेळानं ते माझा हात हातात घेतात॥
चालता चालता अलगद उचलून कडेवर घेतात॥
अन एक अनोखा प्रवास सुरु होतो॥
आम्ही अवकाशाचा कप्पा कप्पा व्यापत जातो॥
सारे आभास कापत जातो॥
सा-या दिशा व्यापून आम्ही दिगंत होतो॥
या स्वरांसोबत चालता चालता मी ही अनंत होतो..
Friday, January 15, 2010
Subscribe to:
Posts (Atom)

